लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांचा प्रश्न एका कॉलवर सुटणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

24 Jan 2026 12:44:13
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna
 
मुंबई : ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna ) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. योजनेचा फॉर्म भरताना किंवा ई-केवायसी करताना जर काही तांत्रिक चुका झाल्या असतील तर आता त्या लाभार्थी महिलांना एका फोन कॉलवर सुधारता येणार आहे यासाठी राज्य सरकारने १८१ हा विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. ज्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहि‍णांच्या शंकांचे निरासन एका फोन कॉलवर होऊ शकणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
 
ई-केवाईसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी अनावधाने चुकीचा पर्याय निवडला होता ज्यामुळे त्यांची अर्जाची प्रक्रिया पुर्ण होऊ शकली नव्हती. याच तक्रारीची दखल घेत आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, १८१ या हेल्पलाईन नंबरवर प्रशिक्षित कॉल ऑपरेटर्स तैनात केले आहेत ज्यामुळे हे कॉल ऑपरेटर्स महिलांच्या तांत्रिक अडचणी फोन कॉलवर सोडवण्यास मार्गदर्शन करू शकतात. यामुळे महिलांना आता त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.
 
हेही वाचा : Atal Pension Yojana : पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट; अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ! नेमका निर्णय काय?
 
याशिवाय अंगणवाडीतील सेविका थेट लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत यामुळे, ज्या महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहील्या आहेत त्यांचा पडताळणीनंतर पात्र महिलांना या याेजनेचा लाभ मिळू शकणार आहे. आदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत लाडक्या बहि‍णींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0