Narendra Modi: रेल्वे संपर्क मजबूत झाला की विकासालाही गती: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

23 Jan 2026 19:20:57

 
तिरुवनंतपुरम: (Narendra Modi) देशातील सामान्य प्रवाशांच्या प्रवासाला आधुनिकतेची जोड देणाऱ्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सेवेला केरळच्या राजधानीतून नवे बळ मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार,दि.२३ रोजी तिरुवनंतपुरम येथून तीन नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून दक्षिण भारतातील आंतरराज्य रेल्वे संपर्क अधिक मजबूत केला. (Narendra Modi)
पंतप्रधानांनी नागरकोईल–मंगळूरू, तिरुवनंतपुरम–तांबरम आणि तिरुवनंतपुरम–चारलापल्ली या मार्गांवरील अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले. या गाड्यांमुळे केरळचा संपर्क तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या प्रमुख राज्यांशी अधिक वेगाने आणि विश्वासार्हरीत्या जोडला जाणार आहे. (Narendra Modi)
 
हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Museum : छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयातील कला महोत्सवाला उदंड प्रतिसाद
अमृत भारत एक्सप्रेस ही सेवा परवडणाऱ्या दरात आधुनिक रेल्वे प्रवास देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असून, ती विशेषतः कामगार, विद्यार्थी, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या गाड्यांमध्ये सुधारित आसन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता, अधिक चांगली प्रकाशयोजना, आधुनिक अंतर्गत रचना आणि प्रवासादरम्यानचा आराम यावर विशेष भर देण्यात आला आहे. (Narendra Modi)
या नव्या सेवांमुळे दक्षिण भारतातील धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि पर्यटन केंद्रांमधील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. मंगळूरू, तांबरम आणि चारलापल्लीसारख्या महत्त्वाच्या केंद्रांशी थेट जोडणी झाल्याने व्यापार व उद्योगांना गती मिळणार असून, रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. (Narendra Modi)
 
हे वाचलात का ?: Congress MLA Controversy : हिंदू संमेलनात सहभागी झाल्यामुळे काँग्रेस आमदार अडचणीत
‘अमृत भारत एक्सप्रेस’ ही केवळ नवी रेल्वे सेवा नसून, ती भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे. वेग, सुरक्षितता, परवडणारा खर्च आणि विश्वासार्ह सेवा या चार स्तंभांवर उभी असलेली ही संकल्पना दक्षिण भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासाला नवे परिमाण देणारी ठरणार आहे. (Narendra Modi)
“अमृत भारत एक्सप्रेस ही केवळ नवी रेल्वेगाडी नाही, तर ती सामान्य नागरिकांच्या आकांक्षांचा प्रवास आहे. परवडणाऱ्या दरात आधुनिक, सुरक्षित आणि वेगवान प्रवास देत ही सेवा दक्षिण भारतातील राज्यांना अधिक जवळ आणेल. रेल्वे संपर्क मजबूत झाला की विकासालाही नवी गती मिळते.” (Narendra Modi)
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


Powered By Sangraha 9.0