
महापालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सर्वच प्रमुख पक्षांना महापौरपदासाठी उमेदवार देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि मनसे यांच्यात राजकीय हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत. (BMC)
खुल्या वर्गासाठी आरक्षण असल्याने जातीय किंवा प्रवर्गीय अटी लागू नसून, राजकीय ताकद, संख्याबळ आणि युती–आघाडी यांवर महापौरपदाची गणिते ठरणार आहेत. (BMC)