कल्याण–डोंबिवली : (KDMC) कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली असून, यंदाचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरपदाच्या आरक्षण सोडतीला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. (KDMC)
महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापौरपदाचे आरक्षण जाहीर होणे महत्त्वाचे मानले जात आहे. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत यावेळी सत्तासमीकरणे चुरशीची असून, भाजप, शिवसेना शिंदे गट, मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील हालचाली वाढल्या आहेत. महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने युती, आघाडी आणि पाठिंब्याच्या राजकारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (KDMC)