Kerala Viral Video: व्हायरल व्हिडिओचा जीवघेणा परिणाम! इन्फ्लुएन्सरच्या आरोपांनंतर केरळमधील ४२ वर्षीय व्यक्तीने आपले जीवन संपवले, नेमकं प्रकरण काय?

21 Jan 2026 12:22:56
 
Kerala Viral Video
 
केरळ: (Kerala Viral Video) प्रगत तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे आज कोणतीही घटना क्षणार्धात जनतेसमोर आणता येते. चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरत असले, तरी केवळ लाईक्स, कमेंट्स आणि सहानुभूती मिळवण्यासाठी त्याचा गैरवापर केला जात असल्याचंही चित्र दिसत आहे. अशा गैरवापराचे परिणाम किती गंभीर असू शकतात, याचं धक्कादायक उदाहरण केरळमधून समोर आलं आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीने व्हायरल केलेल्या व्हिडिओनंतर ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Kerala Viral Video)
 
केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी दीपक यू हा एका कापड कंपनीत काम करत होता. १६ जानेवारी रोजी कामानिमित्त तो कन्नूरला जाण्यासाठी बसने प्रवास करत होता. याच बसमध्ये एका तरुणीला दीपकचा चुकून स्पर्श झाला. संबंधित तरुणीने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. (Kerala Viral Video)
 
हेही वाचा :  वर्दीतले अब्रूभक्षक
 
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दीपक मानसिक तणावाखाली गेला होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तो सतत अस्वस्थ राहत होता आणि दोन दिवस त्याने अन्नही घेतलं नव्हतं. रविवारी सकाळी सुमारे सात वाजता आई-वडील त्याला उठवण्यासाठी गेले असता, खोलीचा दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. (Kerala Viral Video)
 
दीपकच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी संबंधित महिला इन्फ्लुएन्सरवर गंभीर आरोप केले आहेत. व्हायरल व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात अपमान सहन करावा लागल्यानेच दीपकने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. “आमचा मुलगा निर्दोष होता. तो असं कधीच करू शकत नाही,” असं सांगत त्यांनी तरुणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. (Kerala Viral Video)
 
हे वाचलात का?: गरिबी विरुद्ध ‘नवाबी’ थाट!  
 
या प्रकरणी पोलिसांनी शिमजिता मुस्तफा नावाच्या महिला इन्फ्लुएन्सरविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर ती फरार असल्याचे माहिती मिळत आहे. नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले असून, व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर सखोल तपास केला जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. (Kerala Viral Video)
 
दरम्यान, दीपकच्या मृत्यूनंतर शिमजिता मुस्तफा हिने पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करून आपली बाजू मांडली आहे. “मला वाटलं नव्हतं की तो आत्महत्या करेल,” असं म्हणत तिने आपल्या आरोपांवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. मात्र, तिने यापूर्वी पोस्ट केलेला व्हायरल व्हिडिओ डिलीट केला आहे. (Kerala Viral Video)
 
 
Powered By Sangraha 9.0