Gas tanker accident: वाशी नाका–माहुल रस्त्यावर भरलेल्या गॅस टँकरचा अपघात; वाहतूक ठप्प, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

21 Jan 2026 18:55:14



Gas tanker accident 
मुंबई : (Gas tanker accident) चेंबूरमधील वाशी नाका ते माहुल या मुख्य रस्त्यावर संध्याकाळच्या सुमारस भरलेल्या गॅस टँकरचा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावरून जात असताना गॅस टँकर अचानक उलटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र संभाव्य धोका लक्षात घेता घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांचे मोठे पथक तातडीने दाखल झाले आहे. (Gas tanker accident)
 

हेही वाचा :  Third railway line: तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे विदर्भात प्रवाशांना फटका; २४ ते ३१ जानेवारीदरम्यान १४ गाड्या रद्द

 

माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूकीची समस्या निर्माण झाली होती. त्याचदरम्यान टँकर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर रस्त्यावरच उलटला. अपघातानंतर काही वेळासाठी वाशी नाका–माहुल रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. (Gas tanker accident)
 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे मोठे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य गॅस गळतीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दल सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. क्रेनच्या मदतीने उलटलेला टँकर उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, टँकर गॅसने पूर्ण भरलेला असल्यामुळे तो सुरक्षितपणे उचलताना अडचणी येत आहेत. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार हा टँकर भारत गॅस कंपनीचा असल्याचे समजत आहे. (Gas tanker accident)
 
 


Powered By Sangraha 9.0