लंडनमध्ये टिळा लावणाऱ्या हिंदू विद्यार्थ्याला त्रास

21 Jan 2026 15:41:37
UK School
 
मुंबई : ( UK School ) लंडनच्या विकर्स ग्रीन प्रायमरी स्कूलमधील ८ वर्षीय विद्यार्थ्याला कपाळावर टिळा लावल्यामुळे शिक्षकांचा त्रास सहन करावा लागला. त्या विद्यार्थ्याचा इतका छळ करण्यात आला की त्याच्या कुटुंबाने अखेर त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश हिंदू आणि भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी सामाजिक चळवळ आणि वकिली संस्था इनसाइट यूकेने आवाज उठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. संघटनेच्या म्हणण्यानुसार शिक्षकांनी हिंदू रीतिरिवाजांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्या विद्यार्थ्यावर आणि त्याच्या पालकांवर दबाव आणला होता.
 
विद्यार्थ्याच्या पालकांनी इतर हिंदू कुटुंबातील सदस्यांसह शाळा प्रशासन आणि शिक्षकांना हिंदू धार्मिक रीतिरिवाजांबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु शाळेने त्यांची विनंती नाकारली. विद्यार्थ्याच्या पालकांनी असा आरोप केला की मुख्याध्यापकांनी जेवणाच्या सुट्ट्यांमध्येही विद्यार्थ्यावर लक्ष ठेवले, ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने घरी आल्यानंतर त्याच्या पालकांना हि गोष्ट सांगितली.
 
हेही वाचा : जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात डॉ. रमीजचा लॅपटॉप जप्त
 
या संपूर्ण घटनेवर इनसाइट यूकेने आवाज उठवत हे वर्तन अल्पवयीन मुलासाठी पूर्णपणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर विकार्स ग्रीन प्रायमरी स्कूलमधील धार्मिक भेदभावामुळे आतापर्यंत चार मुलांना शाळा सोडण्यास भाग पाडले असल्याचे सांगितले आहे. ब्रिटिश कायद्यानुसार हा कायदा समानता कायदा २०१० अंतर्गत थेट धार्मिक भेदभाव आहे, जिथे धर्म हा एक संरक्षित वैशिष्ट्य आहे.
 
Powered By Sangraha 9.0