मुंबई : ( Forced Conversion Case ) उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी मधील एका हिंदू महिला डॉक्टरचे लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे शोधून काढले आहेत. तपासादरम्यान आरोपी डॉक्टर रमीजचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. रमीज सध्या पोलिस कोठडीत आहे आणि त्याची सखोल चौकशी सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रमीजची एका गुप्त ठिकाणी चौकशी केली जात आहे.
विशेष कृती दल (एसटीएफ) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्याच्या मोबाईल फोनवरून अनेक चॅट्स आणि संपर्क क्रमांक डिलीट केले होते, जे फॉरेन्सिक टीमच्या मदतीने जप्त केले जात आहेत. पोलिसांना यामुळे त्याच्या कथित नेटवर्क आणि सहकाऱ्यांबद्दल माहिती मिळेल. एसटीएफने केलेल्या चौकशीत धर्मांतरासाठी दबाव आणल्याच्या आरोपांबाबतच्या प्रश्नांवर रमीज मौन राहिला.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी पीडितेला आरोपीबरोबर चर्चा करण्यास सांगितले परंतु पीडितेने त्याच्याशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी पीडितेची भावनिकता लक्षात घेऊन चर्चा थांबवली. याशिवाय तिच्याकडून धर्मांतरात सहभागी असलेल्या एका धर्मगुरू आणि एका साक्षीदाराबद्दल माहिती मिळाली असून ज्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.