मुंबई : ( Saina Nehwal ) ऑलिम्पिकपदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने निवृत्तीची घोषणा केली आहे. लंडन ऑलिम्पिक२०१२ मध्ये कांस्यपदक जिंकणारी ती भारतातील पहिली ऑलिम्पिक पदक विजेती होती. सायनाने २०१८ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. राष्टकुल स्पर्धेत सहभागी होऊन सुवर्णपदक जिंकून तिने देशाची मान अभिमानाने उंचावली होती. मात्र, त्यानंतर सततच्या गुडघ्याच्या दुखापतींमुळे तिच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकदरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीचा फटका तिच्या खेळाला बसला होता.
अलिकडे तिने एका पोडकास्टमध्ये बोलताना आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ती म्हणाली की, “मी प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वीच खेळणं थांबवलं होतं. मला वाटतं, मी माझ्या स्वतःच्या अटींवर या खेळात प्रवेश केला आणि स्वतःच्या अटींवरच तो सोडला. त्यामुळे वेगळी घोषणा करण्याची गरज वाटली नाही.”
हेही वाचा : Davos World Economic Forum : दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचाच डंका !
ती पुढे असेही म्हणाली की, जगातील सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी तुम्हाला आठ ते नऊ तास सराव करावा लागतो. पण माझा गुडघा फक्त एक दोन तासांतच हार मानत होता. माझ्यासाठी खेळणं हे खुप कठीण झाले होते त्यामुळे आता ‘बस्स’ म्हणायची वेळ आली.” या सर्व कारणांमुळे आपण निवृत्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं सायना नेहवालने स्पष्ट केलं आहे.