दावोस : (Davos World Economic Forum) “महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस आहे,” हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (Davos World Economic Forum) पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात उतरले. तब्बल १४ लाख ५० हजार कोटी रुपयांचे १९ सामंजस्य करार झाल्याने राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली असून, यामधून १५ लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत. ही गुंतवणूक थेट सर्वसामान्य जनतेच्या रोजगार, उत्पन्न आणि जीवनमानाशी जोडलेली आहे.(Davos World Economic Forum)
राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे करार झाले. आयटी, डेटा सेंटर, हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद उद्योग, ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाज बांधणी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या क्षेत्रांतील गुंतवणुकीमुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.(Davos World Economic Forum)
महत्त्वाचे म्हणजे ही गुंतवणूक केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि अहिल्यानगर यांसारख्या भागांमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे प्रादेशिक असमतोल कमी होऊन ग्रामीण व आदिवासी भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे. उद्योग वाढीसोबतच स्थानिक पातळीवर रोजगार, पायाभूत सुविधा आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होणार आहे.(Davos World Economic Forum)
महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्य शासन गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध आहे. (Davos World Economic Forum) करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वॉर रूमच्या माध्यमातून सतत देखरेख केली जाणार असून उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत व दर्जेदार पद्धतीने दिल्या जातील. 'मैत्री' या एकल खिडकी व्यवस्थेमुळे गुंतवणूक सुलभ झाली असून, कोका-कोला, आयकिया, स्कोडा ऑटो यांसारख्या जागतिक कंपन्यांनी विस्ताराची तयारी दर्शवली आहे. कार्लसबर्गसारख्या कंपन्यांनीही राज्याच्या उद्योगधोरणाचे कौतुक केले आहे. एकूणच, ही ऐतिहासिक गुंतवणूक राज्य सरकारच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे फलित असून, जनतेसाठी रोजगार, राज्यासाठी विकास आणि महाराष्ट्रासाठी उज्ज्वल भविष्य घडवणारी ठरणार आहे.(Davos World Economic Forum)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.