शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणी

20 Jan 2026 16:20:45
Shiv Sena
 
मुंबई : ( Shiv Sena ) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आजपासून (बुधवार, दि. २०) अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे. सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होणार असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय देण्यात येईल.
 
२०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ४० आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारे त्यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला. पुढे हे संख्याबळ लक्षात घेता निवडणूक आयोगानेही शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे यांच्याकडे सुपुर्द केले.
 
 हेही वाचा : Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : ‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला बळ
 
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीचे संकेत दिले होते. त्यानुसार, आता २१ आणि २२ जानेवारी रोजी अंतिम युक्तीवाद होणार असून त्यानंतर निकाल येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाकडे जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतही लवकरच सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0