Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : ‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला बळ

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ओव्हरहेड विद्युतीकरणाचे काम वेगात

Total Views |
Mumbai-Ahmedabad Bullet Train Project
 
नवी दिल्ली : (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) काम सातत्याने प्रगतीपथावर असून संपूर्ण मार्गावर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन खांब उभारणीचे काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रणालीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत जमिनीवर होत असलेल्या प्रभावी अंमलबजावणीचे ते प्रतीक मानले जात आहे.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
या प्रकल्पाद्वारे (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) जागतिक स्तरावर सिद्ध झालेल्या हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाचा अवलंब करताना देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकटी दिली जात आहे. सुरक्षित, सुरळीत आणि कार्यक्षम अतिजलद ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी व्हायाडक्टसह मार्गाच्या महत्त्वाच्या विभागांमध्ये ओएचई खांब बसवले जात आहेत. हे खांब बुलेट ट्रेनसाठी (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) आवश्यक असलेल्या ट्रॅक्शन पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा घटक असून, विश्वसनीय व अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणार आहेत.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
प्रकल्पाअंतर्गत (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) उन्नत व्हायाडक्ट्सवर जमिनीच्या पातळीपासून मोठ्या उंचीवर ओएचई खांब उभारले जात आहेत. संपूर्ण मार्गावर ९.५ ते १४.५ मीटर उंचीचे २०,००० पेक्षा अधिक खांब बसवले जाणार असून, हे खांब ओव्हरहेड तारा, अर्थिंग व्यवस्था, फिटिंग तसेच इतर उपकरणांसह २×२५ के व्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन पॉवर सिस्टीमला आधार देतील.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
हेही  वाचा : Delhi High Court : बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे कडक आदेश!  
 
अखंड कर्षण वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मुंबई–अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) अतिजलद रेल्वे मार्गावर ट्रॅक्शन सबस्टेशन्स आणि डिस्ट्रिब्युशन सबस्टेशन्स यांचे सशक्त जाळे विकसित केले जात आहे. ओएचई खांब हे रेल्वे रुळांच्या बाजूला उभारले जाणारे उभे पोलादी संरचना असून, ओव्हरहेड विद्युत तारांची योग्य उंची, संरेखन आणि ताण कायम ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांना सातत्यपूर्ण व सुरक्षित वीजपुरवठा शक्य होतो.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) या दोन महानगरांमधील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. यासोबतच संपूर्ण मार्गावरील दळणवळणात सुधारणा होणार असून रोजगारनिर्मिती, उत्पादन क्षेत्राला चालना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. देशात प्रगत रेल्वे तंत्रज्ञानाचा अवलंब करून जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.