मुंबई : (MNS) एकीकडे भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून येत असताना दुसरीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा अस्त्र काढले आहे. निवडणुकीची किती मोठी तयारी मनसे नेतृत्वाने गांभीर्याने केली आहे हे त्याचेच द्योतक आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा सर्वात जास्त फटका जर कुणाला बसला असेल तर ती आहे राज ठाकरे ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना. उबाठा ने महापालिका निवडणुकीत मनसेला दिलेल्या जागा पाहता नेमकी ही युती मनसे संपवण्यासाठी आहे का ? असा प्रश्न सामान्य मनसैनिकास पडलेला आहे. कारण जागा वाटपात मनसेला समाधानकारक जागाच मिळाल्या नाहीत. आणि प्रचार ऐन टप्यात जवळ आला असताना.मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देत मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.२ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. (MNS)
हेही वाचा : Municipal Elections : नागपूरात उमेदवारासह कुंटुंबाला घरात कोंडले
वॉर्ड क्रमांक ९७ सांताक्रुज विभागातील जागा उबाठा गटाला गेल्याने मनसेच्या स्थापनेपासून १९ वर्ष ९ महिन्याच्या मनसेच्या साथीला त्यांनी जय महाराष्ट्र केला प्रभाग क्रमांक १९९ मध्ये नाराज शाखा प्रमुखाची जाहीर नाराजी चर्चेत असतानाच हा प्रकार झाल्याने आता ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच प्रश्न चिन्ह उभा राहिले आहे. (MNS)
दुसरीकडे ठाकरे बंधू मराठी माणसाला न्याय देण्यासाठी एकत्र आलोय असे सांगत आहेत.पण वरळी येथील सामान्य महिला मराठी व्यावसायिक सुद्धा याबाबत बोलताना म्हणाल्या "आम्ही मराठी महिला व्यावसायिक असून सुद्धा आम्हाला कॉर्पोरेशन चे लोक आणि पोलिस त्रास देतात.आम्ही व्यवसाय करायचा नाही तर कुणी करायचा मग मराठी माणूस मुंबई बाहेर गेला तर यात चूक कुणाची ? मी महिला आहे मराठी आहे आणि व्यवसाय पण करते ,त्यात माझे पती निधन पावले असून मुलांची जबाबदारी मीच बघते मग मला का त्रास दिला जातो." ही त्यांची प्रतिक्रिया खूप काही बोलून जाते. राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असणारी ही उदाहरणे पाहूनच हतबल झालेल्या मनसैनिकांनी पक्ष सोडून नवीन वाट तर धरली नसेल ? कारण ज्या उबाठा ने इतकी वर्षे सत्तेत राहून लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यांच्या सोबत युती करून पुन्हा जागा वाटपात त्यांनाच झुकते माप म्हणजे हा तर अन्यायच वाटणं स्वाभाविकच आहे. (MNS)