मुंबई : (Toll Plaza) वाहनधारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर आता रोख रक्कमेने (कॅश) टोल भरण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला असून, १ एप्रिलपासून फक्त UPI किंवा FASTag द्वारेच टोल भरावा लागणार आहे. (Toll Plaza)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार. टोल प्लाझावर सुट्टे पैसे नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅश बंद केल्याने एका स्कॅनवर किंवा FASTag द्वारे काही सेकंदात टोल भरता येणार असून, वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे. (Toll Plaza)
सरकारचा उद्देश टोल प्लाझावरची वाहतूक कोंडी कमी करणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देणे हा आहे. UPI आणि FASTagमुळे पेमेंट पारदर्शक राहणार असून प्रत्येक व्यवहाराचा डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध राहील. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Toll Plaza)
पुढे त्यांनी सांगितले की, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून UPI द्वारे टोल भरण्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता देशातील सर्व राष्ट्रीय टोल प्लाझा कॅशलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Toll Plaza)
या निर्णयामुळे वाहनधारकांना FASTag सक्रिय ठेवणे किंवा UPI सुविधा तयार ठेवणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा टोल प्लाझावर अडचण निर्माण होऊ शकते. सरकार लवकरच याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. (Toll Plaza)