मुंबई : (Raj Thackeray) महापालिका निवडणूकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे तमिळनाडूतील नेते अन्नामलाई यांचा “रसमलाई” असा उल्लेख करत, त्यांची खिल्ली उडवली होती. “तामिळनाडूतील माणूस मुंबई, महाराष्ट्र आणि राष्ट्रवादावर कसा काय बोलतो?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाषा, ओळख आणि प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. (Raj Thackeray)
मात्र, त्यानंतर लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राजकीय चित्रच बदलून टाकले. भाजप–महायुतीने मुंबईत दणदणीत विजय मिळवत सत्ता मिळवली आणि सोशल मीडियावर “मुंबईने १० कोटींची रसमलाई विकली” अशा काप्शनसह पोस्ट्स व्हायरल झाल्या. (Raj Thackeray)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीनंतर, भाजपच्या मोठ्या विजयामुळे उत्साहाचे वातावरण होते आणि या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात रसमलाई खरेदी केली, ज्यामुळे शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये तब्बल १० कोटींहून अधिक किंमतीची रसमलाई विकली गेली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवरून, राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांचा केलेला अपमान याच हे प्रत्युत्तर असल्याच म्हटलं जात आहे. (Raj Thackeray)