मुंबई: (BJP) मुंबई मनपा इतीहासात पहिल्यांदाच १० स्विकृत नगरसेवक बसणार आहेत. महाराष्ट्र विधानपरीषदेत २०२३ मध्ये पारीत केलेल्या बिलानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ वरून १० करण्यात आलेली होती. ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांना स्वीकृत नगरसेवक जास्त घेता येणार आहेत.या बिलानंतरची ही महानगरपालिकेची पहीलीच निवडणूक आहे. निकालातील नगरसेवक संख्येनुसार यात भाजपाची संख्या जास्त असणार आहे. चार स्वीकृत नगरसेवक भाजपला मिळणार आहेत.थोडक्या मतात पराभूत झालेले जे मोठे उमेदवार आहेत किंवा ज्यांना या निवडणूकीत तिकीट मिळालेले नाही, ज्यांना पक्ष निर्णयामुळे माघार घ्यावी लागली होती त्यांच्या आशा आता यामुळे पल्लवीत झाल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक म्हणून कुठे तरी संधी मिळेल अशी भावना त्यांच्या मनात आहे.राज्याचा विचार केल्यास २९ महापालिकांसाठीच्या निवडणूकीत एकूण ८९३ प्रभागातील २८६९ जागांपैकी भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वाधिक १४२५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यातसुध्दा सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक निवडीत भाजपच बाजी मारणार आहे. (BJP)
भाजपाने राज्यात २२०९ उमेदवार उभे केले होते त्यातील तब्बल १४२५ विजयी झाले आहेत.६४.५१टक्के इतका भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट आहे. जो सर्वात जास्त असून उबाठाचा स्ट्राईक रेट १२.०८ टक्के तर काँग्रेसचा स्ट्राईक रेट २३ टक्के आहे.राज्यात सर्वात कमी म्हणजे शून्य टक्के स्ट्राईक रेट आम आदमी पक्षाचा लागतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्ट्राईक रेट केवळ ३.९४ टक्के आहे. मनसेने राज्यभर ३३० उमेदवार उभे केले होते त्यातील फक्त १३ विजयी झाले. (BJP)
आश्चर्य म्हणजे एम आय एम ने राज्यात १२६ उमेदवार निवडून आणले आहेत. काँग्रेस,उबाठा,मनसे,शरद पवार गट यापेक्षा एम आय एम चा स्ट्राईक रेट जास्त आहे. विकासाच कोणतही काम नसताना तसेच राज्यात राज्यभर नेतृत्व करेल असा एकही नेता नसताना एम आय एम ला हे मिळालेले यश फक्त आणि फक्त विशिष्ट धर्माच्या आधारावरच मिळालेले आहे असे जाणकारांचे मत आहे. मुंबईत एम आय एम ने आठ जागा जिंकल्या असून राज ठाकरे यांच्या मनसेला आणि समाजवादी पक्षाला सुद्धा मागे टाकले आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव येथे एमआयएम दुसरा क्रमांकाचा मोठा पक्ष बनला आहे. यापूर्वी बिहार विधानसभेत सुद्धा एमआयएम ने काँग्रेसला मागे टाकले होते. भाषिक राजकारण करणाऱ्या राज्यातील पक्षांना हे एक प्रकारे अंजनच म्हणावे लागेल. (BJP)
भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवार दि. १८ रोजी एमआयएमच्या महानगरपालिकेतील यशावर ट्विटद्वारे भाष्य केले आहे आणि इशारा ही दिला आहे. (BJP)
उपाध्ये आपल्या ट्विट मध्ये म्हणतात,"एमआयएमचा उदय’ काँग्रेसचे आणखी एक भीषण पाप!उघड देशविरोधी भाषा करणाऱ्या नेत्यांचा पक्ष म्हणजे एमआयएम.“भारत माता की जय म्हणणार नाही”, “१५ मिनिटं पोलीस हटवा, आम्ही काय करतो ते दाखवतो” अशी झुंडशाही करणाऱ्या या पक्षाला आज महापालिका निवडणुकांत मिळणारी मते हा केवळ राजकीय इशारा नाही! ही तर समाजासाठी व राष्ट्रीय एकतेसाठी धोक्याची घंटा आहे." (BJP)