मुंबई : (Raj K. Purohit) महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष राज के पुरोहित यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि.१७ रोजी रात्री मुंबईच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त भाजपा मीडिया सेलने दिले आहे. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी राजहंस बिल्डिंग, जी रोड , मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे रविवार दिनांक १८ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत ठेवण्यात येणार आहे. (Raj K. Purohit)
आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की,"भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमच्या सर्वांचेच जवळचे मित्र राज पुरोहित यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने भाजपा आणि एकूणच मित्र परिवाराने एक दिलदार व्यक्तिमत्व गमावले आहे. आमदार, प्रतोद आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध भूमिकांमध्ये पक्षाच्या विस्तारात मोठे योगदान दिले. संघटनात्मक प्रक्रियेत एक भक्कम आधार म्हणून ते सदैव उभे असायचे. दृढता आणि आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव होता. सदैव उत्साही, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि सकारात्मकता त्यांच्या ठायी असायची. व्यापारी वर्गात सुद्धा ते लोकप्रिय होते आणि त्यांचे नेतृत्व करीत अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली, ते प्रश्न सोडवून घेतले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सुद्धा प्रचारात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांचे निधन भाजपा परिवारात मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत." (Raj K. Purohit)
हेही वाचा : BJP: स्वीकृत नगरसेवक निवडितसुद्धा भाजपच बाजी मारणार?
श्रद्धांजली अर्पण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत राज पुरोहित यांनी मुंबईतील पागडी आणि भाडेकरूंचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. मुंबईतील विशेषत: कुलाबा व मुंबादेवी मतदारसंघांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. भाजप पक्ष व संघटन मजबूत करण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या परिजनांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो." (Raj K. Purohit)
मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम शोकसंदेशात म्हणाले की,"महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू आणि झुंजार व्यक्तिमत्व हरपले आहे. मुंबादेवी मतदारसंघाचा बुलंद आवाज आणि हिंदुत्वाचा प्रखर विचार मांडणारे नेतृत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची आणि राज्याच्या राजकीय क्षेत्राची न भरून येणारी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच प्रार्थना." (Raj K. Purohit)
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की," भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने मुंबई भाजपने एक ठाम आणि अभ्यासू नेतृत्व गमावले आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतही त्यांनी पक्षासाठी अतिशय जोमाने प्रचारात भाग घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला होता. त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना." (Raj K. Purohit)
हे वाचलात का ?: Navnath Ban: घरात बसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत : नवनाथ बन
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की,"भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राज पुरोहित यांच्या निधनाचे वृत्त क्लेशकारक आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी जपलेली मूल्यनिष्ठा आणि जनतेशी असलेली नाळ ही त्यांच्या कार्याची खरी ओळख होती. पक्ष संघटन, प्रशासन आणि जनसेवा या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. (Raj K. Purohit)
कार्यकर्त्यांना बळ देणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने एक अनुभवी नेता गमावला आहे.माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे." (Raj K. Purohit)
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही याबाबत शोक व्यक्त केला आहे. राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक २२१ मधून विजयी झाला आहे. (Raj K. Purohit)