Phool Singh Baraiya: काँग्रेस आमदार फूल सिंग बरैयांचे संतापजनक विधान; म्हणाले, ‘सुंदर मुलींवर...’

18 Jan 2026 18:56:34
 
Phool Singh Baraiya
 
मुंबई : (Phool Singh Baraiya) मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते आणि आमदार फूल सिंग बरैया यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. “सुंदर मुलींसोबत बलात्कार होऊ शकतो,” असे अत्यंत आक्षेपार्ह विधान त्यांनी केले असून, या वक्तव्यावर राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. (Phool Singh Baraiya)
 
एका मुलाखतीत बरैया म्हणाले, "भारतात बलात्काराचे सर्वाधिक बळी कोण आहेत? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय. बलात्काराचा सिद्धांत असा आहे की जर एखादा पुरूष, त्याची मानसिक स्थिती काहीही असो, रस्त्यावर चालत असताना आणि त्याला एक सुंदर मुलगी दिसली, तर ते त्याचे मन विचलित करू शकते आणि त्याला एखाद्या महिलेवर बलात्कार करण्यास प्रवृत्त करू शकते." (Phool Singh Baraiya)
 
हेही वाचा :  Dr. Mohanji Bhagwat: जगाला धर्म देण्याचे कार्य भारतच करेल: डॉ. मोहनजी भागवत
 
पुढे बरैया यांनी असा दावा केला की, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांना लक्ष्य केले जाते कारण काही प्राचीन ग्रंथांमध्ये असे मानले जाते की या समुदायातील महिलांवर बलात्कार करणे पुण्य आहे, तीर्थयात्रेच्या समतुल्य आहे. (Phool Singh Baraiya)
 
आता त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्यांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0