मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) आपल्या सर्वांना चालवणारे एकच तत्व आहे आणि त्याचे नाव धर्म आहे. भारतवर्षाला जोपर्यंत धर्म चालवेल तोपर्यंत भारतवर्ष विश्वगुरू राहील. कारण जगाकडे असा धर्म नाहीये. हजारो वर्ष अनेक संतांनी हा धर्म जागवला, आता हा धर्म जगाला देण्याचे काम भारतच करेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. ते घाटकोपर (पूर्व) येथील भानुशाली वाडी येथे जैन परंपरेतील सेवाभाव, साधना यांचे दर्शन घडवणाऱ्या ‘विहार सेवक ऊर्जा मिलन’ या कार्यक्रमात बोलत होते. (Dr. Mohanji Bhagwat)
सरसंघचालक म्हणाले की, आपल्याकडे ग्रंथ आहेत, भाषण करणारे लोक आहेत परंतु धर्माचे आचरण करणारे आणि ते सातत्याने मांडणारे संत असतात. यामुळेच अशा कार्यक्रमाला येऊ शकत नाही असे म्हणण्याची शक्यताच नसते. आपल्या देशात नेतृत्व राजकीय किंवा सामाजिक लोक करत नाहीत तर अध्यात्मिक लोकच करतात. त्यामुळे ज्यावेळी संतांचे प्रवचन चालू असते त्यावेळी त्याचे रक्षण करण्याचे कार्य संघ करतो. (Dr. Mohanji Bhagwat)
यावेळी आचार्यश्री विजय राजेन्द्रसूरीश्वरजी महाराज म्हणाले की, आज संघाचा वटवृक्ष निर्माण झाला आहे. ईश्वर सोबत असेल तर कशालाही घाबरण्याची गरज राहत नाही. जीवनामध्ये योगक्षेम यातील दोन्ही करावे लागते. फक्त योग किंवा फक्त क्षेम करून चालत नाही. दोन्ही समान असावे लागते. मोहनजींकडून मिळालेले मार्गदर्शन मला कायमच प्रेरणादायी वाटले आहे. कोणत्याही परिस्थितीत अविचल राहण्याची क्षमता कमी लोकांमध्ये असते ती त्यांच्यात आहे. मला ज्यावेळी देशाची चिंता वाटते, त्यावेळी ते मला सांगतात हळूहळू सगळे ठीक होईल आणि सगळे ठीक होत आहे. (Dr. Mohanji Bhagwat)
या कार्यक्रमप्रसंगी आचार्यश्री विजय अक्षयबोधिसूरीश्वरजी महाराज तसेच आचार्यश्री विजय महाबोधिसूरीश्वरजी महाराज उपस्थित होते. (Dr. Mohanji Bhagwat)
आपण सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे की, जे कार्य करत आहोत त्या कार्याचे वाहक आहोत हे कार्य ईश्वराचे आहे. त्यामुळे अहंकारातून मुक्त होऊन आपण हे कार्य करत राहिले पाहिजे. अहंकारातून मुक्त होणे अवघड असते. परंतु त्या ईश्वराच्या ईच्छेने आपली या कार्यासाठी निवड झाली आहे, असा भाव मनात ठेवला तर अहंकार दूर होऊ शकतो. (Dr. Mohanji Bhagwat)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.