Uttar Pradesh: बरेलीमध्ये रिकाम्या घराचे मदरशात रूपांतर

यूपी पोलिसांकडून १२ जणांना अटक

Total Views |
 
Uttar Pradesh
 
मुंबई : (Uttar Pradesh) उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात बिशरतगंज पोलीस स्टेशन परिसरातील मोहम्मदगंज गावात रिकाम्या घरात नियमित सामूहिक नमाज पठण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मोहम्मदगंज गावातील काही ग्रामस्थांनी आरोप केला की एका खाजगी घराचा वापर तात्पुरत्या मदरशासाठी केला जात होता आणि शुक्रवारी अनेक जण नमाज पठण करत होते. (Uttar Pradesh)
 
हेही वाचा :  भुवनेश्वरचा 'अनंत वासुदेव'
 
गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ताबडतोब गावात छापा टाकला. घटनास्थळी पोलिसांना एका रिकाम्या घरात अनेक लोक प्रार्थना करत जमलेले आढळले. पोलिस येताच पोहोचताच परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन धावाधाव सुरू झाली. यामध्ये बारा जणांना अटक करण्यात आली, तर तीन जण पळून गेले. (Uttar Pradesh)
 
मिळालेल्या माहितीनुसार, ते घर हनीफ नावाच्या व्यक्तीचे आहे. जेव्हा पोलिसांनी उपस्थितांना सामूहिक धार्मिक कार्यक्रमासाठी लेखी परवानगी विचारली तेव्हा कोणतेही वैध कागदपत्रे सादर केली गेली नाहीत. परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी १२ जणांवर शांतता भंग करण्याच्या कलमांखाली आरोप लावले. फरार आरोपींचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. (Uttar Pradesh)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.