मुंबई : (Navnath Ban) "महाराष्ट्राला देशात एक नंबरचे राज्य बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे स्वप्न आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसला गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे घरात बसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत. अडीच वर्षे सत्ता असताना उद्धव ठाकरे साधे मंत्रालयात सुद्धा जाण्याची हिंमत करीत न्हवते. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आहे. विरोधकाप्रमाणे घरात बसून फेसबुक लाईव्ह आणि पत्रकार परिषदा घेण्यासाठी गेले नाहीत." असे प्रतिपादन भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी रविवार दि.१८ रोजी केले. (Navnath Ban)
"मुंबईचा महापौर कोण होणार हे संजय राऊत यांनी ठरवायची गरज नाही. मुंबईकरांनी ठरविले आहे की महापौर भाजपा आणि महायुतीचा होईल. विनाकारण दिवास्वप्न बघत राहू नका. आपले नगरसेवक आपल्याकडे किती राहतील,आपल्या पक्षाची काय अवस्था करून ठेवली आहे याचा विचार संजय राऊत यांनी करावा. पक्षाला घसरगुंडीकडे घेऊन जाण्याचे काम संजय राऊत यांनी केल आहे हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवाव." असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
हेही वाचा : Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमध्ये जल्लोषात स्वागत
"बहुमत कधीच चंचल नसतं ते एकजूट असतं. उबाठाच्या आणि राऊत यांच्या भूमिका चंचल आहेत.राऊत यांनी कधी शरद पवार यांना धोका दिला तर कधी काँग्रेसला ,आता खासदारकीसाठी स्वतः चंचल झाले आहेत. पण राज्यसभेच्या खासदारकीसाठी कितीही चंचलपणा केला तरी ती त्यांना मिळणार नाही आहे." असे बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भयाच नाही तर कायदा आणि विकासाचे नाव आहे.त्यांच्या नावाने कोणालाही घाबरायची गरज नाही.भाजपा आणि महायुती अतिशय भक्कम आहे. राऊत यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी. राऊत जे ब्रँड ब्रँड म्हणत होते त्याचा बँड वाजवण्याचं काम महापालिकेत झाल आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती हेच ब्रँड आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे." असे प्रतिपादन बन यांनी केले. (Navnath Ban)
हे वाचलात का ?: Devendra Fadnavis: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना
"नगरसेवक फुटण्याची भीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाही आहे. उलट संजय राऊत यांनी त्यांच्याच पक्षाचे किती नगरसेवक त्यांच्या सोबत राहतात याची काळजी घ्यावी. राऊत यांनी असाच अहंकार ठेवला तर त्यांचे नगरसेवक सुद्धा त्यांना सोडून जातील." असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
"एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सच्चे शिवसैनिक आहेत. याउलट संजय राऊत हे राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहेत का? हा माझा प्रश्न आहे. राऊत यांनी आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधला. हिरव्या मतांसाठी गुलामी केली. या उलट एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेले."असेही बन यांनी रोखठोक मत व्यक्त केले. (Navnath Ban)