Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमध्ये जल्लोषात स्वागत
18-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Devendra Fadnavis) बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे रविवार दि.१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे झुरिक येथे आयोजित स्वागत समारंभात सर्वप्रथम महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण केले. यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय ,जय महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणा दिल्या ज्याला स्थानिकांनी दाद दिली. यावेळी तेथे स्थायिक महिलांनी परंपरागत महाराष्ट्रीय वेश धारण केला होता. तसेच महिलांच्या लेझीम पथकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. 'स्वागत आहे देवाभाऊ ' अशा नावाचे फलक सुद्धा लावण्यात आले होते. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसह पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचच्यासाठी स्वित्झर्लंड येथे आयोजन करण्यात आले. (Devendra Fadnavis)