Chandrashekhar Bawankule: अमरावती निवडणूक पराभवाचे सखोल विश्लेषण होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

18 Jan 2026 18:24:45
 
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) अमरावती महापालिका निवडणुकीतील पराभवाचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक असून, पराभूत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जाईल. यासाठी अमरावती येथे विशेष चौकशी टीम पाठवण्यात येणार असून, कोणी विरोधात काम केले याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule)
 
नागपूर येथील जिल्हा नियोजन भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमरावतीतील निवडणूक पराभव, महापौर पदाचा कालावधी, युतीचे राजकारण तसेच विरोधकांच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली. (Chandrashekhar Bawankule)
 
अमरावतीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, निवडणुकीत नेमके काय घडले, कोणी पक्षविरोधी काम केले का, याची चौकशी केली जाईल. पराभूत उमेदवारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्याची दखल घेण्यासाठी विशेष टीम अमरावतीला पाठवली जाणार आहे. (Chandrashekhar Bawankule)
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमध्ये जल्लोषात स्वागत
 
मुंबईतील महापौर पदाचा अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ वाटप करण्याच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेची अशी मागणी असल्यास ती योग्य पटलावर चर्चेसाठी घेतली जाईल. भाजपच्या कोअर कमिटीमध्ये यावर सविस्तर चर्चा होईल. भाजप–शिवसेना युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडत त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक ठिकाणी ही युती होत असून, ती निश्चितच चांगली बाब आहे. (Chandrashekhar Bawankule)
 
राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत बावनकुळे म्हणाले, “त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.” काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी केलेली मागणी ही जुनीच कॅसेट असल्याची टीका त्यांनी केली. यापूर्वी २०० मतांनी पराभव झाल्यानंतरही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती, आता पुन्हा तीच मागणी पुढे आणली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
 
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, आरोप करणे हेच त्यांचे रोजचे काम झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाची आणि आमच्या एका वर्षाच्या कामकाजाची तुलना केली तरी वास्तव समोर येईल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला महाराष्ट्र आज देशात सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरत असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, गेल्या वर्षी डावोस परिषदेत १७ लाख ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (एमओयू) झाले असून, त्यापैकी बहुतांश प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहेत. महसूल मंत्री म्हणून औद्योगिक प्रकल्पांसाठी आवश्यक ती जागा सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे गुंतवणूक प्रत्यक्षात येत असल्याचे स्पष्ट होते. (Chandrashekhar Bawankule)
 
  
Powered By Sangraha 9.0