मुस्लीम बहुल भागात पठ्ठ्यानं फडकवला भगवा! भाजपचे माध्यम प्रसिद्धी प्रमुख नवनाथ बन विजयी!

16 Jan 2026 12:07:55
Navnath Ban

मुंबई : ( Mumbai BMC Election Results )
प्रभाग क्रमांक १३५ मधून भाजपचे उमेदवार नवनाथ बन यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. नवनाथ बन यांच्याकडे भाजपचे माध्यम प्रमुख पद आहे.
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : गुलाल उधळला! उबाठा उमेदवाराला धुळ चारत तेजस्वी घोसाळकर विजयी
 
मुळचे मराठवाड्यातील असलेले नवनाथ बन काही वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाले. गेल्या काही काळात ते रोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आपल्या भाजपची भूमिका परखडपणे मांडत होते. त्यांना मानखुर्दच्या प्रभाग क्रमांक १३५ मधून भाजपने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा गटाचे उमेदवार होते. मात्र, या तिन्ही उमेदवारांवर मात करत त्यांनी विजय मिळवला आहे.

Powered By Sangraha 9.0