मुंबई : ( Mumbai BMC Election Results 2026 ) तब्बल नऊ वर्षांनंतर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. त्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
भाजपचे उमेदवार प्रकाश काशीनाथ गंगाधरे यांनी मुंबई वॉर्ड १०४ मध्ये ८,३३१ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी मनसेचे राजेश विनायक चव्हाण यांचा ७,२३८ मते मिळवून पराभव केला आहे.
हेही वाचा : Municipal Elections : ईव्हीएम मशीन वरून ठाण्यात जोरदार राडाV
या निकालामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून, मुंबईतील मनसेच्या राजकीय ताकदीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे.