Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांना माझा हसतानाचा चेहरा पाठवा : नितेश राणे

    16-Jan-2026
Total Views |

Nitesh Rane
 

मुंबई : (Nitesh Rane) मुंबई महानगरपालिका निकालावर पहिली प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की,"उद्धव ठाकरे यांना माझा हसतानाचा चेहरा पहिल्यांदा पाठवा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना माझा जय श्रीराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भगवा झंझावात सर्वत्र आला असून राज्यातील बहुतेक महानगरपालिकेत जय श्रीराम या विचारांचा महापौर बसण्याची तयारी झालेली आहे. मी या सर्व महापालिकेतील मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार मानतो.(Nitesh Rane)





 
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत जय श्रीराम आणि आय लव महादेव या विचारांचे महापौर बसवले जाणार आहेत. ज्यामुळे या ठिकाणी ,राज्यात,देशात वाकड्या नजरेने बघणारे जिहादी होते या सगळ्यांना एक कडक संदेश या निमित्ताने मिळालेला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळी इस्लामाबादची फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे आणि अल्ला हुं अकबर म्हणावे."(Nitesh Rane)