Mumbai BMC Election Results 2026 Live : प्रभाग १६५मध्ये नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक पराभूत, काँग्रेसचे अशरफ आजमी विजयी!

16 Jan 2026 12:55:57
 
Mumbai BMC Election Results 2026 Live
 
मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक १६५ (L वॉर्ड, कुरळा परिसर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कप्तान मलिक (माजी मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ) यांचा या प्रभागातून पराभव झाला असून, काँग्रेसचे मोहम्मद अशरफ आजमी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
हेही वाचा :  Mumbai BMC Election Results 2026 Live : मॅजिक फिगर ओलांडली! मुंबईत भाजप - महायुतीची विजयी घोडदौड सुरुच
 
मतमोजणीच्या अंतिम आकडेवारीनुसार, काँग्रेसचे अशरफ आजमी यांना ७,७८२ मते मिळाली, तर कप्तान मलिक यांना केवळ ४,८६३ मते मिळू शकली. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार रुपेश नारायण पवार यांना ७,२२७ मते मिळूनही ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे या प्रभागात काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवत आपली पकड कायम ठेवली आहे. हा विजय काँग्रेससाठी नवा नसून, २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही याच प्रभागातून अशरफ आजमी विजयी झाले होते. त्या वेळी त्यांना ६,२६८ मते मिळाली होती. यंदा मताधिक्य वाढवत त्यांनी पुन्हा एकदा कुरळा प्रभागावर काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0