Mumbai BMC Election Results 2026 Live : मॅजिक फिगर ओलांडली! मुंबईत भाजप - महायुतीची विजयी घोडदौड सुरुच

    16-Jan-2026   
Total Views |

BMC

मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026)
मुंबईमध्ये भाजप - महायुतीची विजयी घोडदौड सुरू असून राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेने ११४ हून अधिक जागांवर आघाडी घेतली केली आहे. कलानुसार मुंबईत महायुती सत्ता मिळवतानाचे चित्र दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांमध्ये बहुमताचा आकडा ११४ आहे.(Mumbai BMC Election Results 2026)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे कल समोर येत आहेत. राज्यभरात जवळपास महापालिकांवर भाजपाची दमदार कामगिरी बघायला मिळत आहे. भाजपचीच लाट आल्याचे चित्र आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\