Mumbai BMC Election Results 2026 Live : मनसेच्या स्थानिक बंडखोरीनंतरही माजी महापौर किशोरी पेडणेकर विजयी!

16 Jan 2026 16:48:57
 
Mumbai BMC Election Results 2026 Live
 
मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक १९९ मधून शिवसेना (उबाठा) च्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विजय मिळवत आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. मनसेच्या स्थानिक बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असतानाही, पेडणेकर यांनी सर्व विरोधकांना मागे टाकत प्रभाग क्रमांक १९९ ही महत्त्वाची जागा राखून ठेवली. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
हेही वाचा :  BMC Elections : तरुणांच्या मतदानाच्या टक्केवारीचा प्रभाव महायुतीच्या बाजूने
 
या प्रभागात मनसेने सुरुवातीला उबाठाला उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. स्थानिक शाखाप्रमुख व इच्छुक उमेदवार संगीता दळवी यांना डावलून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने संगीता दळवी यांचे पती मारुती दळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, गिरणी कामगाराची मुलगी असलेल्या संगीता दळवी यांनी पक्षासाठी मोठे काम केले असतानाही त्यांना डावलण्यात आले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याविषयी झालेल्या कथित अपशब्दांचाही उल्लेख करत, मराठी माणसाच्या भावनांचा अपमान झाल्याचा आरोप केला होता. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये स्थानिक पातळीवर बंडखोरी झाली. मारुती दळवी यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रभाग क्रमांक १९८ मध्ये पाठिंबा जाहीर करत प्रचार सुरू केला. मात्र प्रभाग १९९ मध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेत, किशोरी पेडणेकर यांनी माफी मागितल्यासच प्रचार जोरात केला जाईल, असे सांगितले होते. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मान देत आपण मराठी अस्मितेसाठी काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0