KDMC Eletion Result कल्याण डोंबिवलीत मनसेचा पहिला विजय! : प्रल्हाद म्हात्रे विजयी

16 Jan 2026 15:16:58


 
KDMC Eletion Result
  
कल्याण-डोंबिवली : (KDMC Eletion Result) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणूक २०२६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक २१ (अ) मधून मनसेचे उमेदवार प्रल्हाद म्हात्रे यांनी दणदणीत विजय मिळवला असून, हा मनसेसाठी कल्याण-डोंबिवलीतील पहिला अधिकृत विजय ठरला आहे. या यशामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. (KDMC Eletion Result)


हेही वाचा : Municipal Elections : ईव्हीएम मशीन वरून ठाण्यात जोरदार राडा

 

प्रल्हाद म्हात्रे यांनी चुरशीच्या लढतीत महायुतीच्या बलाढ्य उमेदवारांचा पराभव केला. प्रचारादरम्यान मराठी अस्मिता, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधांचा अभाव आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा थेट फायदा निकालात मनसेला मिळाल्याचे चित्र दिसून आले. (KDMC Eletion Result)
 

KDMC निवडणुकीत मनसेने एकूण २ जागा जिंकल्या असून, प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह गणेश लांडगे यांनीही विजय मिळवला आहे. दुसरीकडे भाजप ४६ जागांवर, तर शिवसेना (शिंदे गट) २८ जागांवर आघाडीवर असली तरी मनसेचा हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. (KDMC Eletion Result)
 

 

Powered By Sangraha 9.0