Municipal Elections : ईव्हीएम मशीन वरून ठाण्यात जोरदार राडा
16-Jan-2026
Total Views |
ठाणे : (Municipal Elections) ठाणे महानगरपालिका (Municipal Elections) हद्दीतील मानपाडा येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल होते. ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. (Municipal Elections) परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलसांना देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता.(Municipal Elections)
गुरुवारी सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू असताना हा वाद उफाळून आला. भूषण भोईर हे मतदान केंद्रात का आले? यावरून शिंदे समर्थक आणि भोईर समर्थक आमने-सामने आले. ईव्हीएम मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न होत असल्याच्या संशयावरून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. (Municipal Elections) यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला, तसेच मतपेटी घेऊन जाणारी बस अडवल्याने गोंधळात अजूनच भर पडली होती. परंतु पोलिसांनी परिसराचा आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.(Municipal Elections)