मुंबई : ( Rajamma ) स्वतःचे संपूर्ण स्त्रीधन स्वातंत्र्य आंदोलनासाठी अर्पण करणार्या महान देशभक्त आणि स्नेहमूर्ती राजम्मा (१०६) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या ‘राष्ट्र सेविका समिति’च्या वंदनीय प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांच्या मातोश्री होत्या. त्यांनी कधीही दागिने परिधान केले नाहीत.
हेही वाचा : मुंबईत बांगलादेशी घुसखोरांचा 'हॉकर्स जिहाद'; स्थानिक मराठी व्यावसायिकांच्या पोटावर गदा
त्यांचे संस्कार पुढे मुला-मुलींना समाजसेवेसाठी जीवन अर्पण करण्याची प्रेरणा देणारे ठरले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र नागराजजी हे संघाचे प्रचारक आहेत. द्वितीय पुत्र मंजुनाथजी व त्यांची पत्नी सुमाजी यांनी गृहस्थाश्रमाचा उत्तम निर्वाह करत जीवन सार्थ केले आहे.