मुंबई : ( Hawkers Jihad ) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा पाया कोळी, आगरी, भंडारी, मराठी कारागीर, हिंदू व्यापारी आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी घातला. पण आज हाच मराठी माणूस आणि हिंदू समाज मुंबईतील पारंपरिक व्यवसायांतून हळूहळू बाजूला सरनाता दिसतोय. बांगलादेशी घुसखोर योजनाबद्ध पद्धतीने ‘बेकायदेशीर फेरीवाला व्यवसाय’ करून सार्वजनिक जागा, पदपथ, बाजारपेठा व आर्थिक व्यवस्था ताब्यात घेत आहेत. यावरून ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘व्होट जिहाद’नंतर आता ‘हॉकर्स जिहाद’चे प्रमाण मुंबईत वाढू लागल्याचे दिसतेय.
एक काळ असा होता की, भाजी मंडई, मासळी बाजार, दूधवितरण, फळविक्रेते, पदपथावरील लघु उद्योग, छोटे हॉटेल्स, किराणा दुकाने, त्याचबरोबर चांभार, लोहार, कुंभार, सुतार, न्हावी, शिंपी यांसारखे अनेक पारंपरिक व्यवसाय जतन करणारा बहुसंख्य मराठी व इतर हिंदू समाज होता. ‘हॉकर्स जिहाद’च्या वाढत्या प्रमाणामुळे या सर्वांचे अस्तित्व धोयात आले आहे. चर्मकार समाजाचा चर्मोद्योग आणि हिंदू खाटिक समाजाचा पारंपरिक मांस-मटण व्यवसाय एका नव्या आणि योजनाबद्ध आव्हानाला सामोरे जात आहे.
संत रोहिदास समाज म्हणजेच हिंदू चांभारांचा चर्मोद्योग व्यवसाय हा मुंबई महानगरपालिकेकडून ‘एमएमसी अॅट’नुसार परवाने घेऊन चालतो; तरीही धोरणात्मक सुधारणा न झाल्याने हा व्यवसाय सतत अडचणीत येत असतो. यात बिनापरवाना व्यवसाय करणार्यांना कुणीही तोंड देत नाही. कुणाही त्यांच्यावर कारवाई करीत नाही. लोहार समाजालाही त्याचप्रमाणे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
पारंपरिक घरगुती औद्योगिक अवजारे बनवणार्या लोहारांसमोर बांगलादेशींची मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाल्याचे दिसत आहे. मुंबईत प्रामुख्याने भायखळा, धारावी, कुर्ला, गोवंडी, माहीम, वांद्रे आणि अंधेरी यांसारख्या भागांत यांच्या वस्तीमुळे अनधिकृत अवजारे, रस्त्यावरील स्टॉल्स, बिनापरवाना व्यवसाय आदी वेगाने फोफावताना दिसत आहेत. त्यामुळे शहरातील पदपथ, बाजारपेठा आणि सार्वजनिक जागांवर वाढत असलेली बेकायदेशीर अतिक्रमणे, विनापरवाना फेरीवाले यामुळे अवकळा आल्याचे दिसत आहे. या घटकांकडून एकप्रकारे छुपी अर्थव्यवस्थाच चालवली जात असते. शहरातील सुजाण नागरिकांनी हे प्रश्न कठोरपणे हाताळलेच पाहिजेत.
हिंदू खाटिक समाजाचा पारंपरिक मांस-मटण व्यवसायही त्याच समस्येने त्रस्त आहे. कायदेशीर परवानाधारक दुकाने नियमांचे पालन करत असताना, रस्त्यावर विनापरवाना कत्तलीचे बिनधास्त उभे राहणारे स्टॉल आणि स्थलांतरित गटांचे व्यवसाय जलद गतीने वाढत आहेत. याचप्रकारे इतरही हिंदू समाजाचे पारंपरिक उद्योग अनियमित आणि अवैध व्यवसायांच्या दबावाखाली आहेत.
मुंबईचा मूळ रहिवासी मच्छीमारांची निवासी क्षेत्र जमीन कमी होत चालली आहे. इथे परराज्यांतील, परदेशांतील लोकांची वस्ती वाढत आहे. ‘सीआरझेड’च्या निर्बंधांमुळे कोळीवाड्यांच्या विकासावर मर्यादा येत आहेत. मुंबईतील सर्व मच्छीमार वस्तीतील मूळ रहिवासी व त्यांच्या निवासी जागा, कोळी गावठाणे याची नोंद आणि सीमा चिन्हांकन होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मच्छीमार समाजाचा निवास सुरक्षित होईल. बांगलादेशी मजूर स्वस्त दरात मासेमारी बोटीवर जात आहेत. त्यामुळे कोळीवाड्यांची व मत्स्यव्यवसायाची आर्थिक, सामाजिक, तसेच पर्यावरणसुरक्षा धोयात आली आहे. पैशांच्या जोरावर मत्स्यव्यवसायात शिरकाव होत आहे. बांगलादेशी घुसखोर अधिकृत महानगरपालिका मंडईत मासेविक्री करीत नाहीत. रस्ते अडवून किंवा नागरी वस्तीत फिरून मासे विकतात. यामुळे मंडईत मासेविक्री करणार्या मूळ रहिवासी कोळी महिलांचा व्यवसाय ठप्प होत चालला आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक