मुंबई :( Proloy Chaki ) बांगलादेशातील माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षातील हिंदू नेते प्रोलोय चकी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कुटुंबीयांनी तुरुंग प्रशासनावर योग्य वैद्यकीय सेवा न दिल्याचा आरोप केल्याची माहिती आहे. २०२४ मधील भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित स्फोट प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. हेच आंदोलन पुढे ‘जुलै उठाव’ म्हणून ओळखले गेले आणि त्यातून शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून खाली आले.
अशी माहिती आहे की, पाबना जिल्ह्यातील अवामी लीगचे सांस्कृतिक सचिव असलेले चकी यांचा रविवारी राजशाही मेडिकल कॉलेज रुग्णालयात, तुरुंग कोठडीत असतानाच मृत्यू झाला. पाबना कारागृह अधीक्षक एम. डी. ओमर फारूक यांनी सांगितले की, चकी यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग अशा अनेक आजारांचा त्रास होता. त्यामुळे तुरुंगातील डॉक्टरांनी त्यांना प्रथम पाबना सदर रुग्णालयात पाठवले आणि तिथून शुक्रवारी रात्री राजशाही मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले. रविवारी रात्री ९ नंतर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक