मुंबई असुरक्षित करण्यासाठी घुसखोरांचा सागरी जिहाद

Total Views |
Illegal Muslim Encroachments
 
मुंबई : ( Illegal Muslim Encroachments ) देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला सुरक्षेचा धोका जमिनीवरूनच नाही तर पाण्यातून देखील आहे. मुंबईला सुमारे १४९ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबईवर झालेला २६\११ चा हल्ला दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे येऊनच केला होता. त्यामुळे मुंबई सुरक्षित राहावी असे वाटत असेल तर किनारपट्ट्यांवर राहणारे लोक भारतीय असायला हवेत. परंतु संशोधनानुसार मिळालेल्या माहितीनुसार, किनारपट्टीवर अवैध बांगलादेशी मुस्लिमांच्या वस्त्या उभारल्या गेल्या आहेत. दक्षिण मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात कोस्टल लाईनवर अवैध छोटे मोठे दर्गे बांधण्यात आले आहेत. आजूबाजूला बांगलादेशी घुसखोरांच्या झोपडपट्ट्या वसवण्यात आल्या आहेत. या दर्ग्यांचा वापर अवैध घुसखोर मुंबईत स्थिरस्थावर करण्यासाठी केला जात असल्याचा स्थानिकांकडून आरोप केला जात आहे.
 
हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उत्तर किनारपट्टीवर उत्तन दर्गा अगदी समुद्राच्या लगत आहे. त्याच्या आजूबाजूला आधी मुस्लिम लोकवस्ती कमी प्रमाणात होती. सध्या खूप मोठ्या प्रमाणावर या भागात अवैध घुसखोरांची लोकवस्ती पाहायला मिळते. माहिमच्या, वसईच्या किल्ल्यानजीक अवैध घुसखोरांची लोकवस्ती वसवण्यात आली आहे. डोंगरीच्या किल्ल्याशेजारी देखील अशीच अवैध वस्ती आढळते. चेंबूर चिता कॅम्पशेजारी देखील अनधिकृत वस्ती आहे. मुंबईतील प्रसिद्ध वर्सोवा पॅटर्न आणि मालवणी पॅटर्न या भागात तर अवैध घुसखोरांच्या घाणेरड्या राहणीमान आणि सुरक्षेच्या कारणास्तव हिंदूंनी पलायन केले आहे.
 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, सध्या मुंबईत असलेल्या सत्तर टक्के अवैध मुस्लिमांकडे आधार कार्ड सारखी कागदपत्रे आहेत. मुंबईला उद्ध्वस्त करायचे असेल किंवा जोखडात बांधून ठेवायचे असेल तर इथली सामाजिक लोकसंख्या बदलून एका विशिष्ट समाजाच्या लोकांची संख्या वाढवली तर हे सर्व शक्य होईल, असे देशविरोधी ताकदींना वाटते. त्यामुळेच या सर्व अवैध घुसखोरांवर कारवाई व्हावी असे स्थानिकांना वाटते.
 
हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद घटला! सक्रिय स्थानिक दहशतवादी एकेरी अंकावर; लष्करप्रमुखांनी दिली माहिती
 
देशातील हिंदूंकडून संविधानाचे पालन करण्याचा आग्रह धरला जातो मात्र, एका विशिष्ट समुदायाकडून हि अपेक्षा केली जात नाही. आज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोर अतिक्रमण करून राहत आहेत. प्रशासनाने आणि एवढी वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्यांनी या घुसखोरीवर जाणीवपूर्वक डोळेझाक केली. मुंबई वाचवायची असेल तर समुद्रकिनारपट्टी सुरक्षित हवी.
 
- स्वामी भारतानंद सरस्वती
( अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्र महामंत्री ) 
 
समुद्र किनारपट्ट्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यात आले आहे. यामागचे कारण शोधले तर लक्षात येते की, येथील व्यावसायिकांना बांगलादेशी मजूर स्वस्त दरात उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांना या परिसरात आणले जाते, त्यांची वस्ती उभारली जाते. या अवैध घुसखोरांमुळे येथील पारंपारिक मच्छिमार मात्र या परिसरातून निघून जात आहे. किंवा मच्छिमारीचा व्यवसाय सोडून अन्य व्यावसायांकडे वळत आहे.
 
- अनिल देशमुख
( अध्ययन गटप्रमुख, सागरी सुरक्षा मंच )
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.