जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद घटला! सक्रिय स्थानिक दहशतवादी एकेरी अंकावर; लष्करप्रमुखांनी दिली माहिती

    13-Jan-2026   
Total Views |

Army Chief

मुंबई : (Army Chief General Upendra Dwivedi)
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा सकारात्मक बदल घडून आला असून, सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या आता एकेरी अंकावर आली असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली आहे.१५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्ष २०२५ मध्ये ३१ दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यात आले असून, त्यापैकी ६५ टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते.

या कारवाईत ऑपरेशन महोदव दरम्यान ठार करण्यात आलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ३ दहशतवाद्यांचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भरती अत्यंत नगण्य असून २०२५ मध्ये ती केवळ दोन इतकी राहिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.तसेच, यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेत ४ लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले असून, ही संख्या मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले.(Army Chief General Upendra Dwivedi)

ऑपरेशन सिंदूरदरम्यान तिन्ही दलांमधील समन्वय आणि सैन्याचा पराक्रम दिसून आला. 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमामुळे सैन्याची ताकद वाढली असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला अधिक प्रोत्साहन दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LoC) सैन्याची तैनाती संतुलित आणि प्रभावी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Army Chief General Upendra Dwivedi)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\