अहिल्यानगर : (BJP alliance) अहिल्यानगर शहरातील सुयोग पार्क, आदर्श नगर परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हाणामारीत एका तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये सध्या महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, याच पार्श्वभूमीवर भाजप युतीचे उमेदवार दत्ता सोमनाथ गाडळकर यांच्या कुटुंबावर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात सिद्धांत देवकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीवर चाकूने वार करण्यात आला आहे. (BJP alliance)
हेही वाचा : राज ठाकरेंच्या अंगणात ‘सुगीचे दिवस’ नेमके कुणाचे?
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीतील वादातून हा हल्ला करण्यात आला. या घटनेत आर्यन एकाडे, स्वाती विजय गाडळकर यांनाही मारहाण झाली आहे. दत्ता गाडळकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत आदेश जाधव, राज जाधव (रा. टिळक रोड), निलेश गाडळकर, मनोज गाडळकर (रा. गाडळकर मळा), चिकू ऊर्फ श्रीकांत सरोदे (रा. स्टेशन रोड), अभिजित दळवी (रा. काटवण खंडोबा), ऋषिकेश घुले तसेच ५ ते ७ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP alliance)
घटनेच्या आधी गाडळकर यांचा भाचा यश याच्यावर चारचाकी वाहन घालण्याचा प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानंतर सुयोग पार्क परिसरात शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला. काही आरोपी हातात लाकडी दांडके, कोयते व चाकू घेऊन आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याच वेळी आदेश जाधव याने सिद्धांत देवकर याच्या छातीवर चाकूने वार केला, तर राज जाधव याने धारदार शस्त्राने सिध्देश झावरे यांच्या गळ्यावर हल्ला केल्याचेही आरोप आहेत. महिलांनाही मारहाण व अश्लील वर्तन करण्यात आल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. (BJP alliance)