Supriya Sule: अदानींचे आणि आमचे संबंध खूप जुने! अदानी ग्लॅमरमध्ये नव्हते तेव्हापासून आम्ही त्यांच्या सोबत : सुप्रिया सुळे

13 Jan 2026 13:15:03
 Supriya Sule
 
मुंबई : (Supriya Sule) महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. अदानी यांना मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या जात असल्याचा आरोप ठाकरे बंधूच्या प्रचार अजेंड्यातील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. (Supriya Sule)
 
हेही वाचा :  आत्ता बोला! धारावी प्रकल्पाचं टेंडर उद्धव ठाकरेंच्या काळातच अदानीला! देवाभाऊंनीच केली पोलखोल
 
माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना बारामतीतील एका कार्यक्रमात गौतम अदानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याबाबत प्रश्न विचारला. याचवेळी त्यांच्या आघाडीतील उबाठा आणि मनसेकडून अदानींवर गंभीर आरोप केले जात असल्याचा उल्लेख करत, त्या आरोपांशी तुम्ही सहमत आहात का, असा थेट सवाल करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही एकाच आघाडीत आहोत म्हणून आमची सगळी मतं जुळतीलच असं नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, वैयक्तिक नातेसंबंध आणि राजकीय आघाडी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. (Supriya Sule)
 
हेही वाचा : नाशकात ‘उबाठा’ नेतृत्वहीन  
 
सुळे पुढे म्हणाल्या, “आमचं आणि अदानी यांचं नात आम्ही कधीच लपवलेलं नाही. आज त्यांना ग्लॅमर आलाय, पण याआधीही गेली ३० वर्षं ते आमच्या घरी यायचे. तेव्हा मात्र कुणालाही आक्षेप नव्हता. प्रत्येक आघाडी आणि युतीमध्ये साधारण २० टक्के ‘ग्रे एरिया’ असतोच,” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मतभेद कितपत परिणामकारक ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Supriya Sule)
 
 
Powered By Sangraha 9.0