मुंबई : ( Chitra Wagh ) भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि उबाठा च्या कोरोना काळातील कारभारावर मंगळवार दि. १३ रोजी टीका केली आहे.
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "कामगार म्हणजे विकासाचा कणा आहे.पण मध्यंतरी विकासाला ग्रहण लावणारया उबाठा सरकारच्या काळात सेफटी किट्समध्ये थेट घोटाळा झाल्याच कॅग रीपोर्टमध्ये सिद्ध झाले आहे.त्यांनी ४६६१ प्रती कीट्स प्रमाणे २४४३० सेफटी कीट्स खरेदी केले.एकूण खर्च तब्बल ८८८ कोटी रुपयांचा व्यवहार कागदावर दाखवण्यात आला.
हेही वाचा : सचिन सावंत यांच्या आरोपाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रत्युत्तर
प्रत्यक्ष फक्त १२२५० कामगारांना लाभ मिळाला.उरलेले पैसे कुणाच्या खात्यात गेले.पण लोकांनी निवडून दिलेल महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर ही फाईल उघडली थेट चौकशी सुरू झाली. डुप्लीकेट नाव काढून टाकण्यात आली डीबीटी सक्तीची केली.कामगारांच आरोग्य,त्यांच्या मूलांच शिक्षण,कौशल्यविकास आणि महिला कामगारांसाठी प्रसूतिसहाय्याला प्राध्यान देण्यात आल.आज कामगारांच्या घामाचा पैसा दलालांना नाही तर कामगारालाच मिळतोय म्हणूनच तर न भुतो न भविष्यती असा विकास घडतोय."