सचिन सावंत यांच्या आरोपाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रत्युत्तर

    13-Jan-2026
Total Views |
Mangal Prabhat Lodha
 
मुंबई : ( Mangal Prabhat Lodha ) काँग्रेसचे सचिन सावंत यांच्या आरोपाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार दि. १३ रोजी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या एक्स हँडलवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
यात मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणतात, "सोनू जलान संदर्भात सचिन सावंत यांनी जे आरोप केले आहेत, त्यामध्ये सत्यस्थिती अशी आहे की मी भाजपा उमेदवाराच्या समर्थनार्थ मालवणी–मालाड येथील एव्हरशाइन नगरमध्ये प्रचार करत होतो. त्याच सोसायटीत स्थानिक आमदार अस्लम शेखही राहतात.
 
हेही वाचा : रविंद्र चव्हाण यांच्यावरील टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर
 
माझी बैठक सुरू झाल्यानंतर त्यांनी माझ्या सभेची माहिती घेण्यासाठी काही माणसांना माझ्या मागे उभे केले होते, त्यामध्ये सोनू जलान याचाही समावेश होता.सोनू जलानसारख्या लोकांना कोण सोबत घेतं आणि कोण त्यांना दूर ठेवतं, हे सर्वांना चांगलेच माहीत आहे. माझे सार्वजनिक जीवन नेहमीच पारदर्शक राहिले आहे. कोणत्याही परिस्थितीत मी अशा लोकांना माझ्यासोबत घेणार नाही किंवा सोबत राहू देणार नाही."