नवी दिल्ली : (Stock market) केंद्र सरकारने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या १ फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा साक्षीदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Stock market)
हेही वाचा : मुंबईच्या पुनर्विकासावर ठाकरेंना पोटशूळ का?
दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने शेअर मार्केट खुला राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यासंदर्भात एशियन स्टॉक एक्सचेंज (ASE) कडून माहिती देण्यात आली असून, बजेटच्या पार्श्वभूमीवर रविवारीही शेअर मार्केट सुरू ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी मार्केट सुरू ठेवल्यास त्याचा थेट परिणाम शेअर मार्केटमधील हालचालींवर दिसून येण्याची शक्यता आहे. (Stock market)