मुंबई : (Nitesh Rane) भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे कोणत्याही अँगलने बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र वाटत नाहीत, असे विधान केले आहे. (Nitesh Rane)
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “उद्धव ठाकरे हिंदू आहेत का, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. आमच्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय धर्मांतर झाले असून ते आता आपले राहिलेले नाहीत, असा घणाघातही राणेंनी केला. (Nitesh Rane)
हेही वाचा : पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरविणार!
बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना नितेश राणे म्हणाले की, १९९२-९३ च्या दंगलींच्या काळात बाळासाहेबांनी मुंबईतील हिंदूंना वाचवले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा विचार सोडून वेगळी वाट स्वीकारली आहे. “उद्धव ठाकरे आज जिहाद्यांबरोबर जाऊन बसले आहेत,” असेही राणे म्हणाले. (Nitesh Rane)