मुंबई : (Central Railway) मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार,दि.११ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वेच्या करी रोड, चिंचपोकळी या जुळ्या स्थानकावर लोकल थांबा रद्द करण्यात येणार आहे. (Central Railway)
परिणामी, प्रवाशांची मोठी गैरसोय होईल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील करी रोड आणि चिंचपोकळी ही दोन्ही स्थानके एकसारखी दिसत असल्याने ती जुळी स्थानके म्हणून ओळखली जातात. रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक असल्याने मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांतील लोकल थांबा रद्द करण्यात येणार आहे. (Central Railway)
हेही वाचा : Devendra Fadnavis : घोटाळेबाजांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वातही घोटाळा केला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील व पुढे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. ब्लॉक कालावधीत लोकल सेवा मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर उपलब्ध नसेल. (Central Railway)
ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक कालावधीत वाशी/ नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द असेल. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत वाशी/ नेरूळ/ पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल रद्द राहतील. तसेच सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत पनवेल/ नेरूळ/वाशी स्थानकांवरून ठाणेकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल रद्द राहतील. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी ब्लाॅक सुरू आहे. या ब्लाॅकमुळे रविवारी अप मार्गावरील ७९ आणि डाऊन मार्गावरील ७४ अशा १५३ लोकल सेवा रद्द असतील. हा ब्लाॅक अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १ ते सकाळी ६.३० पर्यंत आणि अप धीम्या मार्गावर शनिवारी रात्री १ ते पहाटे ४ पर्यंत असेल. (Central Railway)