Devendra Fadnavis : घोटाळेबाजांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वातही घोटाळा केला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    10-Jan-2026   
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) २५ वर्षे घोटाळा करता करता हे इतके घोटाळेबाज झाले यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. चेंबूर येथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. (Devendra Fadnavis)
 
यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम, भाजप नेत्या पूनम महाजन, आ. कालिदास कोळंबकर, आ. प्रसाद लाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "२५ वर्ष ज्यांच्या हाती मुंबई दिली त्यांनी या मुंबईच्या महानगरपालिकेत तीन लाख कोटी रुपयाचा घोटाळा केला. घोटाळा करता करता हे इतके घोटाळेबाजझाले यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला आणि हिंदुत्व सोडून त्या ठिकाणी कोणाचा हात पकडला हे सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत. आम्हाला केवळ कोणाला महापौर बनवायचा याकरता महापालिका नको तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता ही महानगरपालिका हवी आहे." (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून मुस्लीम अनुनयाचेच राजकारण! 
 
घरच्या माणसाची घरच्यांनीच केलेली मुलाखत
 
निवडणुकीचे वातावरण सुरू झाले आणि त्यादरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती सुरू झाल्या. सुरुवातीला उमेदवारांचे आणि नंतर नेत्यांच्या मुलाखती झाल्या. मीसुद्धा काही मुलाखती दिल्या. त्यावेळी त्या त्या शहरातील प्रश्नांची चर्चा केली, आपले व्हिजन मांडले. हे करताना मी जनतेत जाऊन प्रकट मुलाखती केल्या. पण आता नुकतीच मला टीव्हीवर एक मुलाखत पाहायला मिळाली. ही घरच्या माणसाची घरच्यांनीच केलेली मुलाखत होती. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसले होते आणि दुसरीकडे संपादक साहेब त्यांची मुलाखत घेत होते." (Devendra Fadnavis)
 
मी फेकलेली टोपी संपादकांनी थेट त्यांच्या डोक्यात घातली
 
"मी माझ्या पहिल्याच सभेत सांगितले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही कन्फुजन आणि करप्शनची युती आहे. त्यावेळी मी कोण कन्फ्युज आहे आणि कोण करप्ट आहे हे सांगितले नाही. पण ज्यावेळी ही मुलाखत सुरू होती त्यावेळी संजय राऊत त्यांना म्हणाले की, उद्धवजी तुम्हाला फडणवीस कन्फ्युज आणि राज यांना करप्ट म्हणाले. मी टोपी फेकली ती संपादकांनी थेट त्यांच्या डोक्यात घातली आणि कोण कन्फ्युज आणि कोण करप्ट हे अधोरेखित केले," असा टोलाही त्यांनी लगावला. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : महाराष्ट्रावर ‘लंडन पॅटर्न’चे सावट? 
 
मुंबई माझी कर्मभूमी
 
"या मुलाखतीत ते म्हणाले की, भाजपचे नेते मुंबईत जन्मले नसल्याने त्यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मुंबईची नाडी कुणाला माहिती होती का? त्यांचाही जन्म मुंबईला नाही तर पुण्याला झाला होता. जे स्वतःला सांगतात की, आम्ही मुंबईत जन्मलो ते जवान झाले आता म्हातारे व्हायला लागले. पण त्यांनी मुंबईत काय केले? २५ वर्षे सत्ता उपभोगली पण मुंबईतला एकही प्रकल्प तुम्ही दाखवू शकत नाही. मग फायदा काय? मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या १०६ हुतात्म्यांपैकी कितीजण मुंबईत जन्मले होते? माझाही जन्म मुंबईत झाला नाही पण ही माझी कर्मभूमी आहे आणि या मुंबईच्या विकासाचा ध्यास आम्ही घेतला," असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. (Devendra Fadnavis)
 
"मुंबईतील मराठी माणूस मुंबईबाहेर गेला पण तुम्ही त्याला घर देऊ शकला नाहीत. याउलट आम्ही बीडीडी चाळीतील ८० हजार लोकांना आम्ही घर देण्याचे काम केले. धारावीमधील पात्र झोपडपट्टीधारकांना धारावीमध्येच आम्ही घर देणार, कोणालाही बाहेर काढणार नाही. कुंभार समाजाचा धंदा त्याच ठिकाणी चालला पाहिजे यासाठी त्यांना त्याच ठिकाणी चांगल्या व्यवस्था देणार," असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Devendra Fadnavis)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....