लंडनचा महापौर ‘खान’ झाला अन् या जागतिक महानगराच्या दुर्दशेचे फेरे सुरु झाले. लोकसंख्यात्मक बदलांमुळे झालेल्या इस्लामीकरणाच्या आक्रमणाने या शहराच्या, पर्यायाने देशाच्या मूळ संस्कृतीचीच ओळख पुसण्याच्या मार्गावर आहे. मुंबईच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी याच ‘लंडन पॅटर्न’चे सावट घोंगावते आहे. त्याचा घेतलेला हा आढावा...
महाराष्ट्राची एकता धोक्यात आली आहे. मतभेद नाही, तर मनभेद झाल्यामुळे महाराष्ट्रवासीयांचे ऐय धोक्यात आलेले दिसते. आपापसातच मनभेद असतील, तर महाराष्ट्रात ‘लंडन पॅटर्न’ची पुनरावृती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणामुळे भारतावर ओढावलेली परिस्थिती तशी सर्वश्रुत. आता महाराष्ट्रही त्याची शिकार होताना दिसतो. महाराष्ट्राची संस्कृती एकतेची आहे. येथे विविध भाषांचे, संस्कृतीचे आणि धर्मांचे लोक एकत्रितपणे राहतात. परंतु, आज आपली एकता धोक्यात आली आहे. भाषावाद आणि प्रांतवादाच्या विषाने आपल्या समाजाला विभाजित करण्यास सुरुवात केली आहे.
यामागचे कटकारस्थान काय असेल, याचा अभ्यासकांनी, विचारवंतांनी खरंच शोध घ्यायला हवा. जरी काहीजण याकडे अगदीच दुर्लक्ष करीत असले, तरीपण हे दिसते तेवढे साधे प्रकरण नक्कीच नाही, अशी भीती काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे आणि एक कळकळीचे आवाहनही केले आहे - "आपल्या महाराष्ट्राची एकता टिकवून ठेवू, भाषावाद आणि प्रांतवादाच्या विषाला दूर करू आणि हिंदुत्व स्वीकारून आपले राज्य आणि देशाच्या विकासासाठी काम करू.”
महाराष्ट्रात स्थायिक झालेले हिंदू, मग ते गुजराती, मारवाडी वा उत्तर भारतीय असोत, नेहमीच कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राला मानाचे स्थान देत आले आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. उद्योजक मानसिकता महाराष्ट्रात निर्माण करण्यात त्यांचे योगदानही नाकारता येत नाही. मात्र, महाराष्ट्रातील काही नेते नुसताच या गोष्टींचा बोभाटा करत आपली पोळी भाजण्यासाठी मराठी माणसाला चिथावत बसले, तर काही प्रगतशील विचारांच्या लोकांनी मात्र त्यांच्याकडून उद्योजकतेचे धडे घेतले आणि ते आत्मनिर्भर झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची संख्या महाराष्ट्रात तुलनेने जास्त आहे. त्यातही अनेकजण अमराठी आहेत, जे नामवंत उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, सरकारी उच्चपदस्थ आहेत, ज्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या हितासाठी समर्पित भावनेने काम केले. मराठी लोकांशी सुसंवाद साधता यावा म्हणून मराठी भाषा, मराठी सभ्यता आणि मराठी संस्कृतीचा सहर्ष स्वीकार केला. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने ते प्रेरित आहेत. महाराष्ट्राच्या विकासाला मनापासून हातभार लावत आहेत. आपला धर्म, भाषा किंवा प्रांत यापेक्षा आपला देश आणि राज्य महत्त्वाचे आहे, ही जाणीव त्यांना आहे.
विश्व हिंदू परिषदेचे काम करताना, ‘विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम’चे काम करताना, एकत्रितपणे हिंदुत्वासाठी झटताना त्यांना पाहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना यथोचित सन्मान देताना महाराष्ट्रातील जनतेने बघितले आहे. सगळे एकत्र येऊन ‘बटेंगे तो कटेंगे’ परधर्मीयांपासून स्वधर्मीयांना सजग आणि सतर्क करत असतानाच, भूमिपुत्र आणि इतरेतर असा द्वेष-लेश निर्माण करण्याचा जिहादी प्रयत्न होत आहे.
मुद्दामहून तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळत आहे, अशी त्यांच्यात तिरस्काराची भावना निर्माण करत आहेत. त्यांना मारहाण करून प्रक्षोभित करण्यात येत आहे. सत्तेचे राजकारण ध्यानीमनी नसताना, सत्तेचे प्रलोभन दाखवत स्वतःच्या अस्तिवाची, स्वाभिमानाची लढाई, असा त्यांचा गोंडस गैरसमजही करून देत आहेत. ‘डेमोग्राफिक डिव्हिडंट’ समजावत आपण सत्ता सहजपणे काबीज करू शकू, अशी फोल आशा दिली जात आहे. ही एकप्रकारे दिशाभूल आहे. मुंबईच्या जनसांख्यिकीबद्दल बोलायचे झाले, तर २०२५ मध्ये मुंबईची अंदाजे लोकसंख्या अंदाजे दोन कोटी, २० लाख, ८९ हजार इतकी आहे. ज्यामध्ये ६०.७३ टक्के हिंदू, २५.०६ टक्के मुस्लीम, ५.३८ टक्के जैन, ४.३५ टक्के बौद्ध आणि २.७४ टक्के ख्रिस्ती आहेत.
मुंबईच्या जनसांख्यिकीचे काही महत्त्वाचे मुद्दे :
लक्ष्य जनसंख्या : २०२५ मध्ये दोन कोटी, २० लाख, ८९ हजार
वाढदर : १.९२ टक्के प्रति वर्ष
लक्ष्यदर : ८९.२१ टक्के
मुख्य समुदाय : हिंदू (६०.७३ टक्के), मुस्लीम (२५.०६ टक्के)
जनसंख्या घनत्व : १९ हजार, ६५२ लोक प्रति वर्ग किलोमीटर
‘टिस’ या संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, हिंदू लोकसंख्येचे प्रमाण घटत आहे. मुस्लीम लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. आधी लंडन, नंतर न्यूयॉर्क आणि आता मुंबई? सत्तेचा हव्यास कोणाला आहे? धर्मांध मानसिकता कोणाची आहे? कोण कसाब, कोण कसाई हे माहीत असूनही आपण प्रांतीयवादाच्या भोवर्यात अडवले जात आहोत, हे ‘जिहादी वशीकरण’ म्हणावे का?
‘डेमोग्राफी’ बदलण्यासाठी वापरले जाणारे मार्ग स्पष्ट आहेत. अवैध स्थलांतर, बनावट कागदपत्रे, झोपडपट्ट्यांचा अनियंत्रित विस्तार, सार्वजनिक जागांवर धार्मिक-राजकीय अतिक्रमण आणि त्यामुळे होणार नियोजनबद्ध वाढीव मतदान. खरा धोका परप्रांतीयांचा नाही, तर परधर्मीयांचा आहे. संक्रांतीनंतर ‘किंक्रांत’ करायची की नाही, हे मुंबईकरांवर अवलंबून आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमधून काँग्रेस आणि मुस्लीम समाजातील जुने, दीर्घकालीन राजकीय याराने पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आले आहेत. मतदारांचे विभाजन, उमेदवारांची निवड आणि पक्षांच्या रणनीतींमधून हे गठबंधन सहज लक्षात येण्यासारखे आहे.
महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची योग्य वेळी उकल राजकीय अभ्यासकांना ‘अॅशन प्लॅन’ सुचवण्यात उपयुक्त ठरू शकते. ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव अॅण्ड वॉर’ हे जरी खरे असले, तरी आपल्या स्वार्थासाठी आप्तेष्टांना खड्ड्यात घालणे ही नैतिकता नाही. ‘अझान महोत्सव’ साजरे करण्यामागचे प्रयोजन न कळण्याइतकीही जनता अनभिज्ञ नाही. एकीकडे परप्रांतीयांना विरोध आणि सेना भवनात ‘उत्तर भारतीय महासंघाची’ स्थापना हेही न पचणारे आहे.
मुंबईकरांनो, सावधान! कधीही विकासाच्या मुद्द्यावर न लढता निव्वळ मराठी माणसाला ‘मी मराठी, मुंबई माझी, मराठी माणसासाठी लढतोय’ असे भासवत स्वतःची तिजोरी भरणार्यांचेच कट्टर समर्थक आता जर दुसर्याच भूमिकेत असतील, तर नक्कीच कुठेतरी ‘गनिमी कावा’ शिजत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, सोपे आहे. आपली बाजू भावकी साधूनदेखील लंगडी पडतेय, असे लक्षात आल्यावर राजकीय अशांतता निर्माण करून वर्षानुवर्षे एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते फोडायचे, हिंदूंमध्ये तेढ निर्माण करायची आणि स्वतः मात्र एखाद्या सादिकशी समझोता करायचा. असे असेल का? तुम्हाला काय वाटते?
- प्रिया सावंत
(लेखिका विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या प्रांत उपाध्यक्षा आहेत.)