राज ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी; "२४ तासांच्या आत आरोपीला शोधून काढा", पोलिसांना दिल्या सूचना

17 Sep 2025 13:36:47

मुंबई : (Meenatai Thackeray Statue) मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील(शिवाजी पार्क) मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) तत्काळ शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हे वाचलंत का? - मीनाताई म्हणजे आम्हाला आईसमान, घटनेमागील सत्य लवकरच समोर येईल : शायना एनसी

यावेळी राज ठाकरेंनी मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली. तसेच नेमकी काय व कशी घटना घडली आणि आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली? याचा आढावा घेतला. त्यांनी पोलिसांशी संवाद साधला. २४ तासांच्या आत आरोपीला शोधून काढा, सीसीटीव्ही तपासून माहिती द्या, अशा सूचना राज ठाकरेंनी पोलिसांना दिल्या आहेत. उबाठाप्रमुख उद्धव ठाकरेही लवकरच याठिकाणी येणार असल्याची माहिती आहे.




Powered By Sangraha 9.0