मीनाताई म्हणजे आम्हाला आईसमान, घटनेमागील सत्य लवकरच समोर येईल : शायना एनसी

    17-Sep-2025   
Total Views |

मुंबई : (Meenatai Thackeray Statue) मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यभरातून घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच शिवसेना नेत्या शायना एनसी (Shaina NC) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

शायना एनसी यांनी याघटनेविषयी बोलताना म्हटले आहे की, "मीनाताई आम्हाला आईसमान आहेत. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे. ही घटना जाणूनबुजून घडवून आणली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. राजकारणासाठी कोणीतरी हे कृत्य केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे." या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही शायना एनसी यांनी म्हटले.

मुंबई पोलिसांवर विश्वास असून, या घटनेमागील सत्य लवकरच समोर येईल, असेही सांगण्यात आले. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे, असेही शायना एनसी यांनी म्हटले.





अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\