नवी दिल्ली, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर थेट ५० टक्के आयात शुल्क लादल्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी भारतासोबत कोणतीही पुढील व्यापार चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ओव्हल ऑफिसमधील पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांना भारतासोबतच्या व्यापार चर्चेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ट्रम्प यांनी जोपर्यंत हे प्रकरण पूर्णतः सुटत नाही, तोपर्यंत कोणतीही व्यापार चर्चा होणार नाही; असे स्पष्ट केले आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवरही निर्बंध लावण्याचा इशारा दिला होता. पत्रकारांनी भारताला विशेष लक्ष का देत आहात, असा सवाल केल्यानंतर ट्रम्प यांनी अधिक कठोर भूमिका मांडल्याचे दिसते.
पंतप्रधान मोदी यांचे चीनकडून स्वागतचीनने जाहीर केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान चीनमधील टियांजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीए) शिखर परिषदेत सहभागी होणार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन त्याविषयी म्हणाले, चीन पंतप्रधान मोदींचे एससीओ शिखर परिषदेसाठी समिटसाठी स्वागत करत आहे. सर्व देशांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही परिषद एकतेचा, मैत्रीचा आणि फलदायी संवादाचा मंच ठरेल, असेही चीनने म्हटले आहे.