
मुंबई : इतर विद्यापीठांच्या तुलनेत एसएनडीटी महिला विद्यापीठ हे महिला सक्षमीकरणासाठी अनोखे आणि प्रेरणादायी काम करत आहे, असे प्रतिपादन फ्लुकोनाझोलचे संस्थापक डॉ. संजय इनामदार यांनी केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) ११०वा वर्धापन दिन सोहळा आज शनिवार ५ जुलै २०२५ रोजी येथील पाटकर सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, “बाकीच्या विद्यापीठाच्या तुलनेमध्ये हे विद्यापीठ वेगळे आहे कारण ह्या विद्यापीठाने महिलाना शिकवण्याचे मौल्यवान काम केले आहे. इतर विद्यापीठाच्या तुलनेत हे विद्यापीठ वेगळे आहे. महिलांना घडविण्याचे काम या संस्थेने केले.” या कार्यक्रमाला एनसडीसी सल्लागार डॉ. ज्ञानेश्वर मुळे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्य सरकारच्या माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि ग्लोबल एव्हीएशनच्या अध्यक्ष डॉ. कल्पना सरोज यांच्यासह विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव देखील उपस्थित होत्या.
एसएनडीटी हे केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिले महिला विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १९१६ साली पुण्यात केली. यापूर्वी महिला विद्यापीठ, असेच नाव विद्यापीठाला होते. विठ्ठलदास ठाकरसी यांनी दिलेल्या देणगीनंतर नाव बदलून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी करण्यात आले, अशी माहिती कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी दिली.
विद्यापीठाचे कार्य अखंड सुरू रहावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे
डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेली धडपड अविरत चालू ठेवण्याचे विद्यापीठ करते. या कामत कधीच खंड पडू नये, उलट संस्थेची आणखीन भरभराटच व्हावी अशी इच्छा.”