उद्धव ठाकरे सपत्नीक संजय राऊतांच्या निवासस्थानी! कारण काय?
19-Jul-2025
Total Views | 50
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच शनिवार, १९ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शनिवारी दुपारी उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या मैत्री या निवासस्थानी पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यासुद्धा उपस्थित होत्या. दरम्यान, या भेटीमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी संजय राऊतांच्या आईची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्या निवासस्थानी गेल्याचे सांगण्यात येत आहे.
संजय राऊत तुरुंगात असताना उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते राऊतांच्या घरी त्यांच्या मातोश्रीला भेटण्यासाठी गेले आहेत. यावेळी त्यांच्यात बराचवेळ चर्चा झाली.